कोरोना अपडेट
जिल्ह्यात गुरुवारी १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .

न्यूज जालना दि. ७ :जालना जिल्ह्यात गुरुवारी( दि ७ जानेवारी) १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .यातील उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या ४० जणांनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे .
जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ३०३ वर गेली असून , त्यातील ३५३ जणांचा मृत्यू झाला आहे , तर उपचारानंतर १२ हजार ७४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत .
जालना तालुक्यातील जालना शहर -10, भोकदन तालुक्यतील विरेगाव -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -1, आरटीपीसीआरद्वारे 12 व्यक्तीचा तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 12 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. असे एकुण १० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांनी दिली आहे.