घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यात ऐन थंडीतच ग्रा.पं.निवडणूकीचे वातावरण तापले!

जांबसमर्थ/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील ६२ ग्रामपंचायती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असुन,एकंदरीत ऐन हिवाळ्याच्या थंडीतच ग्रा.पं.निवडणुकीचे वातावरण तापले असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.
उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यामुळे प्रचाराला आता वेग मिळणार आहे.अनेक ग्रामपंचायतीत चुरशीची लढत होणार असल्याचे अंदाज वर्तविले जात आहे.

जो तो उमेदवार यावर्षी आपणच बाजी मारणार ही भावना मनात ठेवून रात्र दिवस प्रचार करताना दिसत आहेत.अनेक ठिकाणी दोन ते तीन गटात सामना होणार असल्याने कोण बाजी मारणार हे मात्र निकालानंतर कळणार आहे.सध्यातरी उमेदवार व मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!