कोरोना अपडेटमहाराष्ट्र
एका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरणाला मान्यता देण्याची आरोग्यमंत्री टोपे यांची मागणी

न्यूज जालना ब्युरो – कोरोनाच्या दोन लसींना देशात मान्यता मिळाली आहे. काही दिवसाता लसीकरण मोहिम देखील सुरु होईल. मात्र कोरोनाची लस मोफत मिळणार की पैसे लागणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.शिवाय एका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरणाला मान्यता द्यावी अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.शिवाय कोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च हा केंद्र सरकारने करायला हवा अशीही मागणी यावेळी त्यांनी केली आहे.
लसीकरणासाठीच्या कोल्ड चैन आणि लागणाऱ्या मनुष्यबळाचा खर्च केंद्र सरकारने द्यावा अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली. दरम्यान पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा पहिला डोस अंदाजे अडीच महिन्यात पूर्ण होऊ शकेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.