भोकरदन तालुका
भोकरदन-जाफराबाद रोडवर ट्राफिक जाम,तब्बल दोन तासांनंतर पोलिसांच्या मदतीने वाहतुक सुरळीत

मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदनचा ट्राफिकचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असुन आज ते भोकरदन-जाफराबाद रोडवर पाहायला मिळाला,आणि तब्बल दोन तास नागरीकांना याचा नाहाकचा ञास सहन करावा लागल्याने नागरीकातुन संताप वैक्त करण्यात येत आहे.
अधिक माहीती अशी की,भोकरदनहुन जाफराबाद कडे जाणारी एम.एच.१९सी.वाय.०६६४ ही ओअर लोड बोलोचे ड्रायवर साईटचे मागच्या चाकाचे एक्सल भोकरदन -जाफराबाद पुलावर सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान अचानक एक्सल तुटल्याने तब्बल दोन तास पुल अरुंध असल्याने या पुलावर ट्राफिक जाफ झाली होती,ही ट्राफिक छञपती शिवाजी महाराज पुतळा ते आन्वा पाट्यापर्यंत जाम झाल्याने याचा सामान्य जनतेला नाहाकचा ञास सहन करावा लागला.
पोलिसांनी वाहतुक सुरळीत करण्यासाठी केली मदत
भोकरदन पोलिस स्टेशनला घटनेची माहीती मिळताच वाहतुक सुरळीत करण्यासाठी पर्यंत्न केले,तसेच लहान गाड्यांना मार्ग ओळुन आलापुर मार्गे आन्वा फाटा असे पाठवण्यात आले पण बस मधील प्रवाशांना दोन तास तात्कळत बसावे लागले आणि मोठ्या गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या..
