भोकरदन तालुका

कर्जबाजारी शेतकर्याची विष प्रशन करुन आत्महत्या

मधुकर सहाने : भोकरदन

  भोकरदन तालुक्यातील माळेगाव येथिल शेतकरी अंकुश गुलाबराबराव जामुंदे वय ४२ यांनी कर्जाला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.

  अधिक माहीती असी की,अंकुश गुलाबराव जामुंदे यांच्याकडे स्टेट बॅंक आॅफ इंडियाचे शाखेचे ६ लाख २५ हजार,महिंद्रा फायनसचे दीड लाख व विविध कार्यकारी सोसायटीचे सोळा हजार रुपयांचे कर्ज होते.यावर्षी शेतीमध्ये उत्पन्न न मिळाल्यामुळे हे कर्ज कसे फेडावे हा प्रश्न त्यांच्या समोर होता.अखेर हतबल  होवुन जामुंदे यांनी ७ जानेवारी रोजी विष घेतले.हा प्रकार कुटुंबींच्या लक्षात येताच पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात दाखल केले होते.माञ त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात दोन मुली,एक मुलगा,बायको असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!