श्री पाराशर शिक्षक पतसंस्थेतर्फे सभासद कन्यादान योजनेचा शुभारंभ

श्री पाराशर शिक्षक पतसंस्थेतर्फे सभासद कन्यादान योजनेचा शुभारंभ
मधुकर सहाने : भोकरदन
श्री पाराशर शिक्षक सहकारी पतसंस्था म भोकरदन तर्फे नविन वर्ष जानेवारी 2021 पासून सभासद कन्यादान योजना घोषित केली होती. 7 जानेवारी रोजी संस्थेचे सभासद नारायण तेलंग्रे यांच्या कन्येचा शुभ विवाह पार पडला. याप्रसंगी चि. सौ. का. पूजा नारायण तेलंग्रे यांच्या नावाने 11000 रुपयांचा धनादेश सर्व सभासदांच्या वतीने कन्यादान म्हणून जेष्ठ संचालक भानुदास सोळुंके यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला आणि सभासद कन्यादान योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष के वाय सोनवणे,प्रदीप इंगळे चेअरमन सचिन देशमुख व्हाईस चेअरमन संजय शास्त्री, संचालक भारत रगडे,कृष्णा वाघ सर,गटसमन्वयक नेव्हार सर, संतोष इंगळे सर,रमेश वाघ सर,श्रीराम दळवी ,गिराम सर, नारायण तळेकर तसेच शिक्षक सभासद उपस्थित होते.
