रविवारपासून भेंडाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

जांब समर्थ/कुलदीप पवार
भेंडाळा (ता.घनसावंगी) येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १० जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे.
यामध्ये दररोज सकाळी काकडा आरती, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन,हरिपाठ,हरिकिर्तन, नंतर हरिजागर होईल.
यात रविवार ह. भ. प. नाना महाराज गोफणे, सोमवार,
ह. भ. प. गंगाराम महाराज राऊत, मंगळवार,ह. भ. प. शारदाताई मापारी, बुधवार,
ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे, गुरूवार,ह. भ. प. संतोष महाराज आढावणे, शुक्रवार,ह. भ. प. रामेश्वर महाराज गुंड, शनिवार,
ह. भ. प. रविदास महाराज शिरसाट,यांचा हरी किर्तन होणार आहे.
तर १७ जानेवारी रविवार रोजी भागवताचार्य
ह. भ. प. बाळु महाराज गिरगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या किर्तन श्रवण व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.