परतूर तालुका

परतुरात माजीसैनिक प्रशांत पुरी यांचा सत्कार

दीपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्क
भारतीय सैन्यात कार्यरत असलेले सैनिक प्रशांत चंद्रकांत पुरी यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल माजीसैनिक संघटनेच्या वतीने रविवारी सत्कार करण्यात आला.
शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत राखे हे होते तर माजीसैनिक तुकाराम उबाळे यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.दरम्यान,सैन्यातून निवृत्त होऊन रेल्वेपोलिस खात्यात सेवा बजावून निवृत्त झाल्याबद्दल माजीसैनिक विजय बोराडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
प्रशांत पुरी हे भारतीय सैन्यदलातून फोर मराठा लाईट इंफ्रटीमधून जुलै २०२० निवृत्त झाले.पुरी यांनी आपल्या सेवाकाळात नौशेरा, पठाणकोट, भूतान,बैसाखी,जम्मू काश्मीर,कोटा इतर ठिकाणी चोखपणे सेवा बजावली.
यावेळी संघटनेच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रकाश हिवाळे,रामचंद्र धुमाळ,सोपान धुमाळ, विलास धुमाळ,नारायण रोकडे,नागनाथ मंत्री, प्रल्हाद बोरकर,महादेव डोम,बेगाजी सोनटक्के, राजेंद्र सोनटक्के,विजय बोराडे इतर माजीसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!