क्राईम

भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातुन खुन

माहोरा : रामेश्वर शेळके

भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून सख्या चुलत्याने शिक्षक असलेल्या कौतिकराव आनंदा गावंडे वय 37 या पुतण्याचा 9 जानेवारी रोजी डोक्यात फावडे मारून खून केला असून भोकरदन पोलिसांनी चुलत्यासह मयताच्या दोन चुलत भावाना अटक केली आहे.
या बाबतची माहिती अशी की कोळेगाव येथील सुखदेव सारजूबा गावंडे, सुधाकर सुखदेव गावंडे, परमेश्वर गावंडे यांचा मयत कोतीक गावंडे यांच्या सोबत शेतीचा जुना वाद आहे, 9 जानेवारी रोजी मयत कोतीक गावंडे सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान शेतात पिकाला पाणी देत असताना वरील तिन्ही आरोपी त्याच्याकडे गेले व तू आमच्याकडे रागाने काय बघतोस म्हणून शिवीगाळ केली त्याचे रूपांतर हाणामारीत झाले तेव्हा आरोपीनी कॊतीक गावंडे यांच्या डोक्यात फावडे व दगडाने मारहाण करून डोके फोडले कोतीक गावंडे याने त्यांच्या तावडीतून सुटका करून दुचाकीवर भोकरदन पोलिस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी त्याला उपचारासाठी पत्र दिले तो ग्रामीण रुग्णालयात गेला ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला जालना येथे जाण्यासाठी रेफर पत्र दिले मात्र तो जालना येथे न जाता सिल्लोड येथे गेला व उपचार घेऊन रात्री 10 वाजेच्या दरम्यान रुग्णवाहिकेत भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आला या ठिकाणी त्याने तक्रार दिल्यानंतर त्याला ठाण्यात च ओबीटीग (वांती) झाली त्यानंतर परत उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले मात्र घाटी रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाला या प्रकरणात भोकरदन पोलिस ठाण्यात प्रथम 324 भा द वी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलात्या नंतर रात्री उशिरा चुलता व दोन चुलत भाऊ आशा तिघांच्या विरुध्द खुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजाराम तडवी, पोलिस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे, कर्मचारी सूर्यकांत केंद्रे, राहुल घुले, अभिजित वायकोस, रुस्तुम जेवळ यांनी आरोपीना तीन तासातच जालना येथील ताब्यात घेऊन अटक केली आहे

  • मयत कौतिकराव गावंडे याचा खून करणारे त्याचे सख्ये काका सुखदेव गावंडे, चुलत भाऊ सुधाकर गावंडे, परमेश्वर गावंडे यांना अटक करण्यात आली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!