कोरोना अपडेट

जालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .


न्यूज जालना दि. १० :जालना जिल्ह्यात रविवारी १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .दरम्यान रविवारी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या १० जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे .

जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ३५९ वर गेली असून , त्यातील ३५४ जणांचा मृत्यू झाला आहे , तर उपचारानंतर १२ हजार ८२९ जण कोरोनामुक्त झाले आहेत .जिल्ह्यात १५ व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल रविवारी पॉझिटीव्ह आला आहे

पॉझिटिव्ह आलेल्या अहवालात जालना तालुक्यातील जालना शहर –13,घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ -1,बदनापुर तालुक्यातील हिवरा तांडा -1, आरटीपीसीआरद्वारे 10 व्यक्तीचा तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 15 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!