घनसावंगी तालुका
कुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास!

कुलदीप पवार/ प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील जाणारा अंबड पाथरी महामार्गाचे काम सुरू असून कुंभार पिंपळगाव येथील मार्केट कमिटी भागातील अतिक्रमण काढण्यात आले त्यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे .
रस्त्याच्या दुतर्फा रस्त्यावर हातगाडी,पानटपरी,इ.दुकाने मोठ्या थाटात थाटली होती. अनेक वेळा सांगूनही अतिक्रमण काढण्यात आले नसल्याने अखेर रविवार ता.१० रोजी येथील अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण हटविण्यात आले तर उर्वरित अतिक्रमण येत्या काही दिवसात हटविण्यात येणार आहे