मंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार

समर्थ राऊत । तळणी
न्यूज जालना नेटवर्क
तळणी : मंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात दिंडी महामार्गाचे इटालियन पेवर ब्लाॅकऐवजी साधे ( निकृष्ट दर्जाचे ) पेवर ब्लॉक बसविण्यात आल्याचा गंभीर आरोप सरपंच उध्दवराव पवार यांनी केला.
तळणी बस स्टॅन्ड भागात पेवर ब्लॉक बसविण्याचे काम सुरु आहे. कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर व संबंधित गुत्तेदार यांच्यात आर्थिक तडजोडमुळे इटालियन पेवर ब्लॉक न बसविता साधे ( निकृष्ट दर्जाचे ) पेवर ब्लॉक बसविण्यात येत आहेत. सदर कामाची एमएसआरडीसीने चौकशी करावी तसेच चौकशी होईपर्यंत कामे बंद ठेवावे , अशी तक्रार तळणीचे सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते उध्दवराव पवार यांनी केली. तर दिंडी महामार्गावरील कामावर कंपनीचे इंजिनिअर व एमएसआरडीसीचे अभियंता दिसुन येत नसल्याने दिंडी महामार्गाची कामे निकृष्ट होत असल्याचा आरोप भीमशक्तीचे तालुकाध्यक्ष गौतम सदावर्ते यांनी केला .
प्रेस मशीनचे पेवर ब्लॉकची ऑडर …
प्रेस मशीनचे पेवर ब्लॉक बसविण्याची ऑडर येत असून पेवर ब्लॉक गुणवत्तापुर्ण असल्याचा दावा संबंधित गुत्तेदार व कंपनीकडून करण्यात आला.