भोकरदन तालुका

भोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी

मधुकर सहाने : भोकरदन

भोकरदन शहरातील जालना रोडवर मालवाहु ट्रकच्या मागच्या टायरखाली मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यु झाला आहे तर एक बाजुने जात असलेली महिला जखमी झाली आहे.

अधिक माहीती अशी की,जालना कडे जाणार्या जी.जे.२६टी.५९६१ या मालवाहु ट्रक जात असतांनी बाजुने जात असलेली सी.बी.झेड.गाडी नंबर एम.एच.२१झेड.०७०७ या गाडीला धक्का लागल्याने मोटारसायकल स्वार शेख कलिम शेख रईस वय १७ रा.उस्मानपेठ भोकरदन या युवकाचा ट्रकच्या मागच्या टायरखाली येवुन जागीच मृत्यू झाला तर बाजुने जात असलेल्या सायराबी शेख पाशु वय ५० या जखमी झाल्या आहेत.अपघात होताच ट्रक ड्रावरने पळ काढला.

घटनेची माहीती मिळताच भोकरदन पोलिस स्टेशनचे कर्मचारी येवुन रोडवर झालेली ट्राफिक सुरळीत करुन शेख कलिम यांना शेवविच्छेदनासाठी ग्रामिण रुग्णालयात उपस्थित युवकांच्या मदतीने हलवण्यात आले.डाॅ.हर्षल डी.महाजन शेवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या स्वाधीन केले.पुढील तपास पोलिस करत असुन सदरील ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!