देशविदेश
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी घेतला कोरोना डोस

अमेरिका वृत्तसंस्था
अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी अमेरिकी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी हे करण्यात येत आहे. साऊथइस्ट वॉशिंग्टनमधील मेडिकल सेंटरमध्ये उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस कमला हॅरिस यांनी कोरोना लसीचा डोस घेतला. दरम्यान, ही लस सुरक्षित असून आपलं रक्षण करते आणि ती घेताना फारसं दुखतही नाही. तसेच प्रत्येकाने लस घेण्याचं आवाहन उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी केलं.