परतूर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

परतूर प्रतिनिधी
परतूर तालुक्यातील खांडवी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव बरकुले यांच्या घरी चोरट्यांनी काल रात्री अडीच वाजेच्या दरम्यान धाडसी चोरी केली आहे.
घराच्या वाड्याच्या पाठीमागील दरवाज्याला ड्रीलने छिद्र पाडून कडी उघडून वाड्यात प्रवेश करून खोलीत जाऊन कपाटात ठेवलेले सहा तोळे, तीन ग्राम सोने व 31 तोळे चांदी, नगदी 26 हजार 400 रुपये घेऊन चोरटे पळून गेल्याचे बरकुले यांच्या फिर्यादी फिर्यादीत म्हटले आहे.
दीड लाख रुपये किमतीचे 5 तोळ्याचे सोन्याचे गंठण, 3 ग्राम व 2 ग्रॅमची सोन्याची अंगठी, बारा हजाराचे चार ग्राम कानातले सोन्याची फुले आणि साखळी, नऊ हजाराचे ज्यात 3 ग्रॅम सोन्याची कानातील रिंग, साडेचार हजाराचे ज्यात दिड ग्राम सोन्याचे कानातील फुल, सोळा हजाराचे ज्यात 22 तोळे चांदीच्या पायातील 5 जोड चैन, एक हजाराचे ज्यात 10 ग्राम पायातील चांदीचे जोडावे,
तीन हजार दोनशे रुपयाचे ज्यात 3 तोळ्याचे चांदीचे चार दिवे, दोन हजाराचे ज्यात 2 तोळ्याचे चांदीचा 1 ग्लास, दोन हजाराचे ज्यात 2 तोळ्याचा पंचीपाळ, एक हजाराचे ज्यात 1 तोळ्याचे हातातील चांदीचे ब्रासलेट, व नगदी 26 हजार 400 रुपये असे एकूण 2 लाख 43 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल अनोळखी चोरट्यांनी लंपास केला.
या प्रकरणी अशोक बरकुले यांच्या फिर्यादी वरुन परतूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावर श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. परतूर तालुक्यात चोरीच्या वारंवार घटना घडत असून पोलिस प्रशासनासमोर तपासाचे आव्हान आहे.