जालना जिल्हादेशविदेश

कर्ज देणारे अनधिकृत डिजिटल मंच, मोबाईल ऍप्सविरुध्द ,आरबीआयचा सावाधानतेचा इशारा

मोबाईल ऍप्सद्वारा कर्जे देऊ करणा-या कंपन्या, संस्थाचा खरेपणा, पुर्वतिहास पडताळुन पहावा.

newsjalna.com     जालना दि. 31  :– जलद व विना अडचण कर्ज मिळण्याची वचने देणाऱ्या, अनाधिकृत डिजिटल मंचांना , मोबाईल ऍप्सना, व्यक्ती, छोटे उद्योग वाढत्या प्रमाणावर बळी पडत असल्याचे रिपोर्टस येत आहेत. या रिपोर्टसमध्ये, कर्जदारांकडुन अत्याधिक व्याज दर व छुपे आकार मागण्यात येत असून कर्ज वसुलीसाठी अस्वीकार्य व दडपशाहीच्या रीती अनुसरण्यात येत असल्याचे आणि कर्जदारांच्या फोन्सवरील डेटा मिळविण्यासाठी कराराचा गैरवापर केला जात असल्याचेही संदर्भ मिळत आहेत.

            आरबीआयकडे पंजीकृत केल्या गेलेल्या बँका, अबँकीय वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आणि संबंधित राज्यांच्या कर्ज देण्याबाबतच्या अधिनियमासारख्या वैधानिक तरतुदीखाली राज्य सरकारकडुन विनियमित केल्या गेलेल्या इतर संस्था कर्ज देण्याच्या कायदेशीर कार्यकृती करु शकतात. जनतेला येथे सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी अशा बेकायदेशीर कार्यकृतींना बळी पडु नये आणि ऑनलाईन, मोबाईल ऍप्सद्वारा कर्जे देऊ करणा-या कंपन्या, संस्थाचा खरेपणा, पुर्वतिहास पडताळुन पहावा. याशिवाय ग्राहकांनी त्यांचा केवायसी कागदपत्रांच्या प्रती अज्ञात व्यक्ती, सत्यांकन न केलेल्या अनधिकृत ऍप्सबरोबर कधीही शेअर करु नयेत आणि असे ऍप्सशी संबंधित बँक खात्याची माहिती, संबंधित कायदा अंमलबजावणी एजन्सींजना किंवा ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी सचेत पोर्टलचा https://sachet.rbi.org.in  उपयोग करावा.

     रिझर्व्ह बँकेनह मँडेट दिले आहे की, बँका व एनबीएफसींच्या वतीने वापरण्यात येणा-या डिजिटल कर्जदायी प्लॅटफॉर्म्सनी त्यांच्या ग्राहकांना बँक, बँकांची किंवा एनबीएफसीची नावे सुरुवातीलाच सांगावीत. रिझर्व्ह बँकेकडे पंजीकृत केलेल्या एनबीएफसीची नावे व पत्ते येथे ऍक्सेस केले जाऊ शकतात आणि आरबीआयकडुन विनियमित करण्यात आलेल्या संस्थांच्या विरुध्दच्या तक्रारी दाखल करण्यासाठीचे पोर्टल https://cms.rbi.org.in  मार्फत ऍक्सेस केले जाऊ शकते, असे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दायाल यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्ह्यात 35 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जिल्ह्यात 35 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जिल्ह्यात 35 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!