आता सातबारा होणार सोपा-

ब्रिटिशकालीन साताबाऱ्यामध्ये काही महत्त्वाचे होणार बदल

519

Get real time updates directly on you device, subscribe now.

dr murkute newsjalna d 27-09

दिगंबर गुजर/संपादक न्यूज जालना

ऑनलाइन जालना जिल्ह्याचे अग्रगण्य डिझिटल बातमीपत्र

जमिनिंच्या व्यवहारासाठी सातबारा खूप महत्त्वाचा आहे पण जुन्या पद्धतीने असलेला सातबारा आता तुम्हाला नव्या आणि सुटसुटीत स्वरुपात मिळणार आहे.राज्य सरकार लवकरच साधा आणि सोपा असा सातबारा तयार करणार आहे.सध्या सगळे व्यवहार हे संगणकाच्या माध्यमातून होतात. त्यामुळे काळाची गरज लक्षात घेत नवीन सातबारा तयार करण्यात येणार आहे.

यासंबंधातील प्रस्ताव हा राज्य शासनाला पाठवण्यात आला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल सादरीकरण देखील करण्यात आल्याची माहिती आहे.आता वापरात असलेला शासकीय भाषेतील सातबारा हा थोडा किचकट आहे. यातल्या नोंदी आणि भाषा हा मोठा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे महसूल विभागाने या ब्रिटिशकालीन साताबाऱ्यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान, या सातबारामध्ये गाव नमुना 7 मध्ये गावाच्या नावासोबत LGD कोड दाखवण्यात येणार आहे. सातबारा 7 मध्ये खाते क्रमांक यापूर्वी इतर हक्क करण्यासोबत नमूद केला जात होता. पण आता नवीन सातबारानुसार खातेदार/खातेदारांच्या नावा सोबतच नमूद केला जाईल अशी माहिती देण्यात आली. यामुळे साताबारा भरणं आणि माहिती सुटसुटीत दिसेल. नवीन सातबाऱ्यामध्ये लागवडी योग्य क्षेत्र, क्षेत्राचं एकक खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार आणि इतर माहितीत बदल करण्यात येणार आहे

सातबारा उताऱ्यात हे बदल होणार

खाते क्रमांक यापूर्वी इतर हक्काच्या रकान्यात नमूद केला जात असतो पण आत्ता तो आता खातेदार अथवा खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जाणार आहे.

 

शेती क्षेत्रासाठी हे.आर.चौ.मी. आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी.हे एकक दर्शविले जाणार आहे.

 

मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजा अथवा ई -कराराच्या नोंदी कंस करून दर्शविल्या जात होत्या पण आत्ता कमी केलेली नावे व नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषा मारून खोडून दर्शविण्यात जाणार आहे.

 

क्षेत्र अकृषिक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना न. 12 ची आवश्यमकता नाही. अशी सूचना त्यावर छापण्यात येणार आहे.

 

नमुना 7 वर नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले (प्रलंबित असे पर्यंत) प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याच्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात येणार.

 

गावाचे नावासोबत एलजीडी कोड ( लोकल गर्व्हेमेन्ट डिरेक्‍टरी) कोड असणार आहे आणि लागवडी योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र यासोबत एकूण क्षेत्र (अ+ब) स्वतंत्ररीत्या दर्शविण्यात येणार आहे.

 

भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एकाही फेरफार प्रलंबित नसल्यास प्रलंबित फेरफार नाही असे दर्शविण्यात येणार आहे.

 

नमुना 7 वर नोंदविण्यात आलेला शेवटचा फेरफार क्रमांक व त्याचा दिनांक इतर हक्क रकाण्याचे खाली शेवटचा रकान्यात दर्शविण्यात येणार – सर्व जुने फेरफार क्रमांक नवीन रकान्यात एकत्रितरीत्या दर्शविण्यात येणार आहेत.

 

शेती क्षेत्रासाठी व बिनशेती क्षेत्रासाठी स्वतंत्र गाव नमुन्यात बदल होणार आणि बिनशेती क्षेत्रासाठीच्या नमुनावर 12 छापला जाणार नाही. तो फक्त नुमना 7 असणार आहे.

 

आता गाव नमुना सातबारा व 8 (अ) मध्ये वरच्या बाजूला मध्यभागी महाराष्ट्र शासनाचा लोगो व ई-महाभूमी प्रकल्पाच्या लोगोचा वाटरमार्क दिसणार आहे

7/12 हा शेतकरी यांच्यासाठी सर्वात महत्वाचा कागद असून यातील झालेले बदल आगामी काळासाठी महत्वपुर्ण ठरतील जसे खाते क्रमांक यापूर्वी इतर हक्काच्या रकान्यात नमूद केला जात असतो पण आत्ता तो आता खातेदार अथवा खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जाणार आहे हा 7/12 शेत-यांसाठी उपयोगी आहे

अक्षय देशमुख
तलाठी सजा म चिंचोली

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new