जालना जिल्ह्यात मयत व्यक्ती घेतात पिएम किसान योजनेचा लाभ.?

Get real time updates directly on you device, subscribe now.


न्यूज जालना ब्युरो /दिगंबर गुजर दि २८

केंद्र शासनाने सुरू केलेली पि एम किसान योजनेत अनेक बोगस लाभार्थीना केंद्र सरकारच्या माध्यमातून लाभ मिळत असल्याच्या अनेक बाबी नूकताच समोर आले असून घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे मात्र चक्क मृत असलेले एक नवे चक्क सहा लाभार्थी पी एम किसान योजनेचा लाभ घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

घनसावंगी तालुक्यातील अरगडे गव्हाण येथे करण्यात आलेल्या चावडी वाचनात ५७५ लाभार्थ्यांपैकी १२ लाभार्थी बोगस असल्याचे समोर आले आहे दरम्यान कुंभार पिंपळगाव येथे १ हजार २२२ एकूण लाभार्थ्यांना पैकी ६०० लाभार्थीची तपासणी अति ४७ बोगस तर ६ मृत लाभार्थ्यांना लाभ मिळत असल्याचे तलाठी एस जी तमशेटे यांनी सांगितले.


असे जिल्ह्यातील आठ तालुके मिळून असंख्य बोगस लाभार्थी ह्या योजनेचा दुरुपयोग करत असल्याचे चित्र आहे सदर्भित रक्कम शासन बोगस लाभार्थ्यांनाकडून वसूल करणार आहे दरम्यान अश्या लाभार्थ्यांनावर गुन्हे ही दाखल करण्यात येऊ शकतील असे संकेत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

ती रक्कम वसूल करणार- उपजिल्हाधिकारी गायकवाड
ज्या लाभार्थ्यांचे नाव बोगस असल्याचे निश्चित झाले आहे त्या लाभार्थीकडून त्यांनी उचलेली रक्कम ही वसूल करण्यात येणारच आहे याबाबत शासनाकडून ही आदेश प्राप्त झाले आहे.

ती नावे वगळली

बोगस आढळून आलेल्या नावे यादीतून वगळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आले आहे दरम्यान उर्वरित राहलेली यादी लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे तर मयत नावे लाभातुन वगळण्यात येणार असल्याचे कुंभार पिंपळगाव चे तलाठी यांनी सांगितले आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new