साहेब जांबसमर्थ येथील कॅनरा बँकेला मॅनेजर नाही पीककर्ज मिळेना ,कृषीमंत्री भुसे यांना शेतकऱ्यांचा फोन ..!

जांबसमर्थ येथील कॅनरा बँक असून अडचण ,नसून खोळंबा.

1,106

Get real time updates directly on you device, subscribe now.

dr murkute newsjalna d 27-09

अजूनही हजारो शेतकरी पिककर्जाच्या प्रतीक्षेत
क्षेत्रीय व्यवस्थापकांना दिले निवेदन.

संपादक / दिगंबर गुजर

घनसावंगी तालुक्यातील श्री क्षेत्र जांब समर्थ येथील (सिडिकेट बँक -जुने नाव) कॅनरा बँकेत शाखा व्यवस्थापक व कृषीअधिकारी नसल्याने मागील अनेक महिन्यापासून पीककर्ज बंद आहेत यातच मूर्ती येथील एका शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांना डारेक्ट संपर्क करून बँकेची परिस्थिती सांगितली याची ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने मात्र बँक व्यवस्थापनकाचे धाबे दणाणले आहेत दरम्यान कृषिमंत्री आणि कारवाई चे आदेश पारित केले असल्याची माहिती समोर येत आहे.

घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील कॅनरा बँकेची अवस्था असून अडचण तर नसून खोळंबा अशी झाली आहे, खरीप हंगाम संपत आला तरीही हजारो शेतकरी पिककर्जपासून वंचित आहेत; त्यामुळे सदरील बँक शाखेला शाखा व्यवस्थापक व कृषी अधिकारी देऊन त्वरित पीककर्ज वाटप करण्यात यावे अशी मागणी बुधावरी (ता.9) कॅनरा बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक यांना निवेदनाद्वारे खातेदार शेतकऱ्यांनी केली आहे.

संबंधित बँकेला शाखा व्यवस्थापक व पूर्णवेळ कृषी अधिकारी नसल्याने अनेक खातेदार शेतकऱ्यांना अजूनही पीककर्ज मिळालेले नाही, यामध्ये कर्जमाफी झालेले शेतकरी, नवीन खातेदार शेतकरी यांना पीककर्ज मिळत नसल्याने हतबल झाले आहेत. निवेदनावर दीपक लक्ष्मणराव तांगडे, गजानन सुभाषराव तांगडे, कैलास माधवराव तांगडे, दत्तात्रय तांगडे , उमेश रमेश तांगडे आदींसह पन्नास शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहे , या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी जालना, जिल्हा उपनिबंधक, अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक , तहसीलदार घनसावंगी, व कॅनरा बँक शाखा जांबसमर्थ यांना देण्यात आल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new