परतूरमध्ये दवाखान्यात गेलेल्या कुलूपबंद घरावर चोरट्यांचा डल्ला

603

Get real time updates directly on you device, subscribe now.

dr murkute newsjalna d 27-09

मोंढा भागात अग्रवाल यांच्या घरी चोरी, ५० हजारांचा मुद्देमाल लंपास
दीपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्क दि १४

रेणुका नगर मधील श्रीकिशन मोहनलाल अग्रवाल यांच्या घरी चोरट्यांनी रविवारी रात्री गेटला लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील सामान अस्ताव्यस्त करून ५० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,रेणुका नगर,पारडगाव रोड येथील श्रीकिशन मोहनलाल अग्रवाल हे रविवारी सकाळी दवाखान्याच्या कामाकरिता घराला कुलूप लावून औरंगाबदला गेले होते.दुसऱ्या दिवशी सकाळी शेजऱ्याचा फोन आला की,तुमच्या घरी चोरी झाली आहे. यावेळी त्यांनी घरी आल्यानंतर घरातील कपाट विचकून लॉकर मध्ये ठेवलेले ५ ग्रॅमचे सोन्याचे कानातले,चांदीचे शिक्के,चांदीचा ग्लास असा ५० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असल्याचे निदर्शनास आले.याबाबत परतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांना घटनेची माहिती मिळताच .तत्काळ पोलीस उप निरीक्षक सुनील बोडखे घटनास्थळी पाठवले त्यांनी सदरील घटनेची पाहणी करून पंचनामा केला .

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new