तर…ऊसतोडणी कामगारांनी कोयता हातात घेऊ नये-सिटू

Get real time updates directly on you device, subscribe now.

न्यूज जालना ब्युरो दि १५

महाराष्ट्र ऊसतोडणी कामगार संघटना(सिटू)च्या वतीने ऊसतोड कामगारांच्या न्याय मागण्यासाठी राज्यभर संप पुकारण्यात आला आहे.

संपबाबतचे निवेदन 25 ऑगस्ट रोजी साखर महासंघ व राज्य सरकारला देण्यात आले आहे.यामध्ये ऊसतोडणी कामगारांचा करार पाच वर्षांचा न करिता तीन वर्षांचा करण्यात यावा,ऊसतोडणी दर प्रति टन ४०० रु करावा,ऊसतोडणी कामगार कल्याणकारी मंडळाचे कामकाज सुरू करून त्यामध्ये कामगारांची नोंदणी करावी आणि त्यांना विविध कल्याणकारी योजना लागू कराव्यात,वाहतूक दरात 50%वाढ करावी,मुकादमाचे कमिशन 25%करण्यात यावे,कोव्हिडं 19 महामारीचा धोका लक्षात घेता कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण उपाय योजना कराव्यात.या व इतर अनेक मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे


या संपाची साखर महासंघाने दखल घेत पुणे येथे दिनांक 10 सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीत साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, उपाध्यक्ष आबासाहेब पाटील,श्रीराम शेटे,पंकजाताई मुंडे,कार्यकारी संचालक संजय खताळ,आदी मान्यवर उपस्तीत होते.या बैठकीत महाराष्ट्र ऊसतोडणी कामगार संघटना(सिटू)चे राज्य सरचिटणीस प्रा.डॉ. कॉम्रेड सुभाष जाधव, कॉम्रेड प्रा. आबासाहेब चौगुले,उपस्तीत होते.यावेळी ऊसतोडणी कामगारांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली,

विचार विनिमय होऊन करार करण्यासाठी पुढील बैठक आयोजित करण्याचे आश्वासन अध्यक्षांनी दिले आहे.
असे असले तरी या बैठकीत ऊसतोड कामगार,वाहतूकदार,मुकादम यांच्या मागण्या बाबत निर्णय न झाल्याने,जोपर्यत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत जालना जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी गाव सोडू नये,कोयता हातात घेऊ नये,असे अवाहन सिटू संघटना जिल्हा सचिव कॉम्रेड गोविंद आर्दड यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new