अवैध गुटख्याचा ट्रक गोंदी पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने पकडला

34 लाखाचा गुटखा आणि 17 लाखाचा ट्रक, असा 51 लाखाचा मुद्देमाल जप्त

294

Get real time updates directly on you device, subscribe now.

dr murkute newsjalna d 27-09

34 लाखाचा गुटखा आणि 17 लाखाचा ट्रक, असा 51 लाखाचा मुद्देमाल जप्त

न्यूज जालना ब्युरो दि १५ गोंदी पोलिसांची मंगळवारी सकाळी 8.00 वा. बीड ते औरंगाबाद रोडवरील गहिनीनाथनगरजवळ पाठलाग करून कारवाई.भरधाव वेगाने जात असलेल्या या ट्रकचा (क्र. केए-56, 5413) संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग करून पकडला.

झाडाझडती घेतली असता, या ट्रकमध्ये वरच्या बाजूला कुजलेल्या ज्वारीच्या 23 गोण्या होत्या, त्याखाली गोवा -1000 गुटख्याच्या 207 गोण्या आढळून आल्या. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, अम्बडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभय भास्करराव देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, पोहवा. भास्कर आहेर, नारायण माळी, नितीन खरात, गृहरक्षक दलाचे जवान गिरी यांची कामगिरी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new