अतिवृष्टीत झालेल्या मोसंबी पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश !

Get real time updates directly on you device, subscribe now.


जांब समर्थ / प्रतिनिधी कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यात मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती.परंतू अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हतबाल झाले होते.याची मदत व पुनर्वसन मंत्री श्री.विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ दखल घेत आज दि.२०रोजी येथील प्रशासनास निर्देश काढून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे नमूद केले.

जिल्हाअधिकारी यांचे आदेश

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील तलाठी,कृषी सहाय्यक,व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकामार्फत मोसंबी पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करावा.असे निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी आदेशात कळविले आहे..

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new