कन्या प्रशालेच्या शिक्षिका प्रभा जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Get real time updates directly on you device, subscribe now.

न्यूज जालना ब्युरो दि १६

जालना येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या माध्यमिक शिक्षिका प्रभा खंडोजी जाधव यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ जालना च्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार इंनरव्हील क्लब अध्यक्ष अध्यक्षा डॉ. नानावटी यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.

प्रभा जाधव यांना हा पुरस्कार शैक्षणिक, सामाजिक, ऑनलाइन शिक्षण, को वीड- 19 जनजागृती, शालेय व सहशालेय उपक्रम, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्या सोयीनुसार रात्री मीटिंग घेणे आदी कार्यांसाठी हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी क्लब च्या अध्यक्षा डॉ. सुजाता नानावटी, सचिव उर्वशी खंडेलवाल, तसेच शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन मंगेश जैवाळ, ढाकरके, पुनम खंडेलवाल यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला . यावेळी तुमच्या शब्बास सकीची पाठीवर दिलेली थांब घेऊन आम्ही जास्तीत जास्त उत्कृष्ट कार्य करू असे प्रतिपादन प्रभा जाधव यांनी आपल्या भाषणात केले.

यापूर्वी श्रीमती जाधव यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार तसेच मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचा विभागस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, तसेच नाशिक रत्न पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new