जालना पोलीस कंट्रोल रूमसाठी ४ अत्याधुनिक वाहने

Get real time updates directly on you device, subscribe now.

न्यूज जालना ब्युरो दि १६

जालना जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी पोलीस विभाग लवकरच ११२ नंबरची तात्काळ सेवा सुरु करणार आहे. या क्रमांकावर येणाऱ्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल रूमला ४ अत्याधुनिक व्हॅन मिळाल्याने पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी समाधान व्यक्त केले आहे.

११२ नंबर ची सेवा लवकरच सुरु होणार असून त्याची रूपरेषा लवकरच ठरणार आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाला मिळालेल्या चारही व्हॅन कंट्रोल रूमसाठी असणार असून या व्हॅनचा उपयोग नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new