पावसाळा संपत आला तरी परतूर तालुक्यातील हस्तुरचा साठवण तलाव तहानलेलाच

Get real time updates directly on you device, subscribe now.

आष्टीकरांसाठी महत्वाचा असणारा तलाव कोरडाच

आष्टी प्रतिनिधी दि १६/रा.नायक
आष्टी ता परतूर येथील शिवारात असलेला हास्तुर साठवण तलाव पावसाळा संपत आला तरी अद्याप ही कोरडेठाक असून परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने या तलावात पुरेसा पाणीसाठा आलेला नसल्याने परिसरात पाणी पातळी खालावणार असून पाणी टंचाई ची भीती देखील नाकारता येत नाही


आष्टी शिवारात सहाशे एकर क्षेत्रावर असलेल्या हास्तुर येथील साठवण तलावाची गावाच्या बाजूने वाहणाऱ्या नंदिनी नदीवर निर्मिती केलेली आहे गावच्या वरच्या बाजूस असलेल्या काऱ्हाळा, लिंगसा, हास्तुर तांडा, हनवडी, सुरुमगाव आदी भागात पडलेल्या पावसाचे पाणी या तलावात येते मात्र या भागात या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने तलावातील केवळ खड्डे भरले आहेत हा तलाव जर भरला तर आष्टीसह परिसराचा पाणीसाठा वाढण्यास मदत होते तसेच सिंचन क्षेत्र ही मोठ्या प्रमाणावर या तलावावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना ही याचा फायदा होतो मात्र तलावाच्या पिचिंग चे काम अपूर्ण असल्याने तलावात जास्त काळ पाणीसाठा शिलक राहत नाही गेल्या वर्षी परतीच्या पावसाने तलाव भरला होता मात्र आठ दहा महिन्यात च
तलाव कोरडेठाक पडला आष्टी सह परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा तलाव वरदान ठरणारा असला तरी प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने तलाव केवळ नावालाच राहिला प्रमाणे दिसुन येत आहे या तलावाच्या माध्यमातून हजारो हेकटर शेती सिंचनाखाली आणता येते त्या साठी तलावाची क्षेत्र वाढवून देखभाल करणे गरजेचे आहे आत्ता परतीच्या पावसाने तरी या तलावात पाणी साठा होण्याची अपेक्षा आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new