सिंधीकाळेगावमध्ये पाणंद रस्त्यातुनच काढावी लागते बिकट वाट ,डांबरीकरणाची मागणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

शेतकर्यांना डोक्यावर न्यावे लागतात शेतातील साहित्य

सिंधीकाळेगाव/प्रतिनिधी दि १६

जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथील गावात जाण्यासाठी असलेला पाणंद रस्ताची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांना पावसाळ्यात शेतातील कामासाठी लागणारे साहित्य घेऊन, जाण्यास अडचण होत आहे. पाणंद रस्त्यामध्ये मोठाले गड्डे असल्याने बैलगाडी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ग्रामस्थ पीरकल्याण पाणंद रस्त्याचा उपायोग करतात. पावसाळ्यामध्ये चिखलामुळे बैलगाडी घेऊन जाणे अवघड होते. त्यामुळे पावसाळ्यात मशागती करण्यासाठी साहित्य डोक्यावर घेऊन जावे लागतात.


या पाणंद रस्त्यात मोठाले खंड्डे असल्याने बैलगाडीचे चाक खड्यामध्ये फसतात .पीरकल्याण, पादीच्या परिसरात शेत असलेल्या शेतकर्यांना नेहमी अडचण सहन करावी लागते. त्यामुळे हा पाणंद रस्ता पक्का करावा अशी मागणी शेतकर्यांनी ग्रामपंचायतसह तहसील कार्यालयाकडे अनेक वेळेस केली आहे. मात्र याबाबत दखल घेण्यात आली नाही .


जालना, तालुक्यातील अनेक गावातील पाणंद रसत्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांना अनेक अडचणींचा सामना कपावा करावा लागत आहे. जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथील पीरकल्याण पाणंद रस्त्याची अवस्था अनेक वर्षापासुन बिकट झाली आहे. त्यामुळे पाणंद रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे शेतकर्यांचे हाल होत आहे. होणारे हाल थांबवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्याचे काम त्वरीत करावे

पीरकल्याण, पांदितुन जाताना अनेक ग्रामस्थाना ञास सहन करावा लागतो चिखलामुळे शेतात जाण्यासाठी बैलगाडी घेऊन जाता येत नाही.शेतीचे औजारे डोक्यावर न्यावे लागतात. पाणंद रस्ता पक्का करावा त्यामुळे परिसरातील शेतकर्यांना ञास सहन करावा लागतो.असे
सिंधीकाळेगाव येथील शेतकर्यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new