मुस्लीम समाजाच्या विरोधात पक्षाकडून घेण्यात येत असलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ जिल्हाध्यक्ष पदांचा राजीनामा

अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

Get real time updates directly on you device, subscribe now.

  दिपक हिवाळे / परतूर न्यूज नेटवर्क भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण मुस्लिमांच्या विरोधात असून भारतीय जनता पार्टीही मुस्लीम विरोधी पार्टी आहे असे म्हणत परतूर येथील जालना जिल्हा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तारेख सिद्दिकी यांनी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एजाज देशमुख यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पाठवला आहे.
दिलेल्या राजीनामा पात्रात म्हटले आहे की, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे ध्येय धोरण मुस्लिम विरोधी असून सध्या मुस्लिम समाजाच्या विरोधात पक्षाकडून घेण्यात येत असलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ अल्पसंख्यांक मोर्चा जालना जिल्हा अध्यक्ष पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. असे तारेख सिद्दीकी यांनी दिलेला राजीनामा म्हटले असून राजीनामा पत्र महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष एजाज देशमुख यांच्याकडे पाठवला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new