राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून कोविड विद्यार्थी पालक अभियान : विशाल पोटे

Get real time updates directly on you device, subscribe now.

मधुकर सहाने : भोकरदन

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पूर्ण राज्यभर कोविड विद्यार्थी-पालक अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांचे पालक करोना विषाणूला बळी पडले आणि दुर्दैवाने त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला अशा पालकांच्या पाल्यांच्या शिक्षणाच्या एकूण खर्चाच्या काही खर्चाची जबाबदारी समाजातील दानशूर व्यक्तींनी घ्यावी असे आवाहन या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

कोविड विषाणूमुळे ज्या विद्यार्थ्यांचे पालक त्यांना सोडून हे जग सोडून गेले त्या विद्यार्थ्यांवर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना मदतीचा हात देणे हि समाजातील सर्वच जणांची सामाजिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी जाणून घेत समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या विद्यार्थ्यांना मदत करणे गरजेचे आहे. या अभियानाच्या माध्यमातून करोनामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या अनेक विद्यार्थी आणि समाजातील दानशूर व्यक्ती यांच्यातील दुवा होण्याचं काम येणाऱ्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या मराठवाडा विभागातील सर्व पदाधिकारी आणि सदस्य करतील अशी भूमिका राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष मा.सुनिलजी गव्हाने विभागाचे अध्यक्ष मा.प्रशांत कदम पाटील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष विशाल पोटे यांनी मांडली आहे.

याप्रमाणे येणाऱ्या काळात जालना जिल्ह्यातील विद्यार्थी आणि दानशूर व्यक्ती यांनी संपर्क करण्याचे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विशाल पोटे यांनी केले आहे. जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा करोना विषाणूच्या साथीत दुर्दैवी मृत्यू झाला अश्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहाचत त्यांना मदत करणार असल्याचे देखील विद्यार्थी तालुका अध्यक्ष विशाल पोटे यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new