ऊसाच्या फडात माणुसकीचा गोडवा..
NEWS JALNA
स्वरा फाउंडेशनतर्फे कष्टकरी ऊसतोड कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप.
किशोर मोरे / घनसावंगी –
तालुक्यातील शिंदेवडगाव शिवारात स्वरा फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम; ऊसतोड कामगारांची दिवाळी गोड करण्याचा स्तुत्य प्रयत्न!
दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण. मात्र, आपल्या कुटुंबापासून दूर राहून शेतशिवारात अहोरात्र कष्ट करणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या आयुष्यातही दिवाळीचा आनंद फुलावा, या सामाजिक भावनेतून स्वरा फाउंडेशनच्या वतीने शिंदेवडगाव शिवारात कष्टकरी ऊसतोड कामगारांना दिवाळी फराळाच्या पॅकेटचे वितरण करण्यात आले.
स्वरा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा जनसेवक डॉ. उमेश बळीराम जाधव यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. ऊन, वारा आणि प्रतिकूल परिस्थितीची तमा न बाळगता समाजासाठी अन्नधान्य निर्माण करणाऱ्या कष्टकरी ऊसतोड कामगारांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
यावेळी ऊसतोड कामगार महिला, पुरुष तसेच त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळी फराळाचे पॅकेट देऊन सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कामगारांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान या उपक्रमाचे खरे फलित ठरले.
समाजातील गरजू, वंचित आणि कष्टकरी घटकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे, हीच खरी समाजसेवा आहे. स्वरा फाउंडेशनच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा सुंदर संदेश देण्यात आला.
यावेळी फाउंडेशनचे सहकारी, डॉ.मच्छिंद्र असोरे, प्रभाकर शिंदे डॉ.अजित भांदर्गे, सदस्य गोरख वराडे, विष्णू पवार, भास्कर नरवडे गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
“सेवा हीच साधना, माणुसकी हाच धर्म!” या भावनेतून स्वरा फाउंडेशनचे सामाजिक कार्य असेच अविरत सुरू राहणार आहे..
ऊसाच्या फडात माणुसकीचा गोडवा..
NEWS JALNA
स्वरा फाउंडेशनतर्फे कष्टकरी ऊसतोड कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप.
किशोर मोरे / घनसावंगी -
तालुक्यातील शिंदेवडगाव शिवारात स्वरा फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम; ऊसतोड कामगारांची दिवाळी गोड करण्याचा स्तुत्य प्रयत्न!
दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण. मात्र, आपल्या कुटुंबापासून दूर राहून शेतशिवारात अहोरात्र कष्ट करणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या आयुष्यातही दिवाळीचा आनंद फुलावा, या सामाजिक भावनेतून स्वरा फाउंडेशनच्या वतीने शिंदेवडगाव शिवारात कष्टकरी ऊसतोड कामगारांना दिवाळी फराळाच्या पॅकेटचे वितरण करण्यात आले.
स्वरा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा जनसेवक डॉ. उमेश बळीराम जाधव यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. ऊन, वारा आणि प्रतिकूल परिस्थितीची तमा न बाळगता समाजासाठी अन्नधान्य निर्माण करणाऱ्या कष्टकरी ऊसतोड कामगारांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
यावेळी ऊसतोड कामगार महिला, पुरुष तसेच त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळी फराळाचे पॅकेट देऊन सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कामगारांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान या उपक्रमाचे खरे फलित ठरले.
समाजातील गरजू, वंचित आणि कष्टकरी घटकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे, हीच खरी समाजसेवा आहे. स्वरा फाउंडेशनच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा सुंदर संदेश देण्यात आला.
यावेळी फाउंडेशनचे सहकारी, डॉ.मच्छिंद्र असोरे, प्रभाकर शिंदे डॉ.अजित भांदर्गे, सदस्य गोरख वराडे, विष्णू पवार, भास्कर नरवडे गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
"सेवा हीच साधना, माणुसकी हाच धर्म!" या भावनेतून स्वरा फाउंडेशनचे सामाजिक कार्य असेच अविरत सुरू राहणार आहे..
मोठी बातमी असल्यास इमेज लांब होऊ शकते. संपूर्ण मजकूर या इमेजमध्ये समाविष्ट केला आहे.



