जालना रेल्वे स्टेशन परिसरात चक्री जुगारावर पोलिसांची धडक कारवाई; १ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त
चार जणांविरुद्ध कारवाई; रोख रक्कम, संगणक, चक्री मटका स्क्रीन आणि दोन मोबाईल जप्त
NEWS JALNA
चार जणांविरुद्ध कारवाई; रोख रक्कम, संगणक, चक्री मटका स्क्रीन आणि दोनमोबाईल जप्त
जालना : शहरातील रेल्वे स्टेशन गेट परिसरात सुरू असलेल्या चक्री जुगारावर जालना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली. कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी एकूण १ लाख १९ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चार जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत ९ हजार ८३० रुपये रोख रक्कम, १५ हजार रुपये किमतीची चक्री मटका स्क्रीन व संगणक तसेच ९५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
कारवाईतील आरोपी
१. रवी हरिसिंग जाधव, रा. रहीम नगर, रेल्वे स्टेशनजवळ, जालना. २. किशोर मधुकर इंगळे, रा. सावित्रीबाई फुले नगर, बुलढाणा. ३. सुनील एकनाथ खरात, रा. नरीमन नगर, रेल्वे स्टेशनजवळ, जालना. ४. सुमेध प्रदीप जाधव, रा. आंबेडकर नगर, बुलढाणा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्री जुगार चालविणाऱ्याचे नाव रवी हरिसिंग जाधव असे आहे.
विशेष पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीरसिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील API अविनाश गडाख, PSI दिनेश बर्डे, HC सचिन कोकणे, LPC मेघा बोराडे, PC नंदकिशोर जैवाळ, PC गोवर्धन हरबक आणि PC विशाल हाळदे यांनी केली.
रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या या कारवाईमुळे अवैध जुगार व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
(फोटो AI निर्मित)

मोठी बातमी असल्यास इमेज लांब होऊ शकते. संपूर्ण मजकूर या इमेजमध्ये समाविष्ट केला आहे.