जालना जिल्हाजिल्हा गुन्हेगारी बातमी

अरगडे गव्हाणमध्ये दोन दिवसांत चार स्फोट; कुत्रा आणि रानडुकरांचा मृत्यू

शेतात संशयास्पद पदार्थ आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून वस्तू हस्तगत

← Back

येथे जाहिरात द्या न्यूज जालना प्रतिनिधी भरती व्यवसायाची जाहिरात दिगंबर गुजर न्यूज जालना

Thank you for your response. ✨

कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील अरगडे गव्हाण येथे एका शेतकऱ्याच्या शेतात दोन दिवसांत चार स्फोट झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. या स्फोटांमध्ये एका कुत्र्यासह दोन रानडुकरांचा मृत्यू झाला. शेतात स्फोटकासारखे संशयास्पद पदार्थ आढळल्याने परिसरात खळबळ उडाली असून, घनसावंगी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

अरगडे गव्हाण येथील शेतकरी नामदेव भोसले यांच्या शेतातील काही भागात अज्ञात व्यक्तीने द्रव्यजन्य पदार्थासह स्फोटकासारखा संशयास्पद पदार्थ ठेवल्याचे समोर आले आहे. या पदार्थामुळे झालेल्या स्फोटात एका कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी याच परिसरात झालेल्या स्फोटात दोन रानडुकरांचा मृत्यू झाला. दोन दिवसांत चार स्फोट झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच घनसावंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी काही संशयास्पद वस्तू व पदार्थ पोलिसांनी ताब्यात घेतले. शेतात आणखी किती ठिकाणी असे पदार्थ ठेवण्यात आले आहेत, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

यासंदर्भात घनसावंगी पोलिस ठाणे तसेच कुंभार पिंपळगाव पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे यांनी घटनास्थळाची पाहणी करून काही वस्तू व पदार्थ ताब्यात घेतल्याचे सांगितले. या प्रकरणाची माहिती घेतली जात असून, पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एका जडीबुटी विक्रेत्या व्यक्तीने शेतातील काही भागात हे पदार्थ ठेवले असल्याचा संशय आहे. संबंधित व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, या व्यक्तीचा घटनेशी नेमका काय संबंध आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
नामदेव भोसले, शेतकरी

शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

अरगडे गव्हाणमधील इतर शेतकऱ्यांच्या शेतातही असे संशयास्पद पदार्थ ठेवण्यात आले आहेत का, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पदार्थांमुळे मानवी जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी तपास करून संशयास्पद पदार्थांचा शोध घ्यावा आणि ग्रामस्थांची भीती दूर करावी, अशी मागणी होत आहे.

NEWS JALNA — एकूण बातमी पृष्ठ भेटी1,100,406
बातमीचे वर्तमानपत्र स्वरूप
NEWS JALNA
आपल्या परिसरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या

ही बातमी वाचल्याबद्दल धन्यवाद • newsjalna.com

मोठी बातमी असल्यास इमेज लांब होऊ शकते. संपूर्ण मजकूर या इमेजमध्ये समाविष्ट केला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!