जालना जिल्हाजिल्हा गुन्हेगारी बातमीपरतूर तालुका

आष्टीत हॉटेलमध्ये सुरू होता कार्ड क्लब; पोलिसांच्या छाप्यात ११ संशयितांवर कारवाई, २.७९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

आष्टी (ता. परतूर) : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आष्टी ते कुंभार पिंपळगाव रोडवरील हॉटेल प्रीतम युवराज येथे सुरू असलेल्या कार्ड क्लबवर जालना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत ११ संशयितांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकी असा एकूण २ लाख ७९ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान ९ हजार ८० रुपये रोख रक्कम, ६० हजार ५०० रुपये किमतीचे ९ मोबाईल आणि २ लाख १० हजार रुपये किमतीच्या ७ दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

येथे जाहिरात द्या न्यूज जालना प्रतिनिधी भरती व्यवसायाची जाहिरात दिगंबर गुजर न्यूज जालना

कारवाईतील ११ संशयितांची नावे

संशयित राहुल मोरे, संशयित अर्जुन गायकवाड, संशयित राजेश मोरे, संशयित प्रकाश मोरे, संशयित किशोर मोरे, संशयित विष्णू वाघमारे, संशयित चिंतामण मोरे, संशयित बाबुराव पवार, संशयित गौतम गायकवाड, संशयित रोहिदास कांबळे, संशयित प्रदीप आढे.

जागामालक : चिंतामण मोरे, रा. बसस्थानक, आष्टी, ता. परतूर.

पोलीस पथकाची कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तेघबीरसिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली API अविनाश गडाख, HC सचिन कोकणे, LPC मेघा बोराडे, PC नंदकिशोर जैवाळ, PC गोवर्धन हरबक आणि PC करभारी नागवे यांनी केली.

दरम्यान, आष्टी पोलीस ठाण्याचे PSI पवार व त्यांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

जालना जिल्ह्यात अवैध जुगार आणि इतर गैरप्रकारांविरुद्ध विशेष पथकाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.

छायाचित्र : AI निर्मित (प्रातिनिधिक)

न्यूज जालना YouTube व्हिडिओ

News Jalna YouTube चॅनेलला भेट द्या

न्यूज जालना Facebook पेज

NEWS JALNA — एकूण बातमी पृष्ठ भेटी1,100,613
बातमीचे वर्तमानपत्र स्वरूप
NEWS JALNA
आपल्या परिसरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या

आष्टीत हॉटेलमध्ये सुरू होता कार्ड क्लब; पोलिसांच्या छाप्यात ११ संशयितांवर कारवाई, २.७९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

आष्टी (ता. परतूर) : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आष्टी ते कुंभार पिंपळगाव रोडवरील हॉटेल प्रीतम युवराज येथे सुरू असलेल्या कार्ड क्लबवर जालना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत ११ संशयितांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकी असा एकूण २ लाख ७९ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान ९ हजार ८० रुपये रोख रक्कम, ६० हजार ५०० रुपये किमतीचे ९ मोबाईल आणि २ लाख १० हजार रुपये किमतीच्या ७ दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

कारवाईतील ११ संशयितांची नावे

संशयित राहुल मोरे, संशयित अर्जुन गायकवाड, संशयित राजेश मोरे, संशयित प्रकाश मोरे, संशयित किशोर मोरे, संशयित विष्णू वाघमारे, संशयित चिंतामण मोरे, संशयित बाबुराव पवार, संशयित गौतम गायकवाड, संशयित रोहिदास कांबळे, संशयित प्रदीप आढे.

जागामालक : चिंतामण मोरे, रा. बसस्थानक, आष्टी, ता. परतूर.

पोलीस पथकाची कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तेघबीरसिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली API अविनाश गडाख, HC सचिन कोकणे, LPC मेघा बोराडे, PC नंदकिशोर जैवाळ, PC गोवर्धन हरबक आणि PC करभारी नागवे यांनी केली.

दरम्यान, आष्टी पोलीस ठाण्याचे PSI पवार व त्यांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

जालना जिल्ह्यात अवैध जुगार आणि इतर गैरप्रकारांविरुद्ध विशेष पथकाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.

छायाचित्र : AI निर्मित (प्रातिनिधिक)

ही बातमी वाचल्याबद्दल धन्यवाद • newsjalna.com

मोठी बातमी असल्यास इमेज लांब होऊ शकते. संपूर्ण मजकूर या इमेजमध्ये समाविष्ट केला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!