भोकरदन तालुका

पारध बसस्थानक की वाहनतळ? बेशिस्त पार्किंगमुळे एसटी चालकांची कसरत !

बसस्थानकाच्या प्रवेशद्वारापासून दोन्ही बाजूंना २०० मीटरपर्यंत खासगी वाहनांचा विळखा; बस वळविण्यासाठीही जागा मिळेना, अरेरावीमुळे महिला व विद्यार्थ्यांना मनस्ताप

भोकरदन | गणेशराव खिस्ते, पिंपळगाव रेणुकाई

येथे जाहिरात द्या न्यूज जालना प्रतिनिधी भरती व्यवसायाची जाहिरात दिगंबर गुजर न्यूज जालना

भोकरदन तालुक्यातील पारध बसस्थानक परिसरात सध्या एसटी बसपेक्षा खासगी वाहनांचीच गर्दी अधिक दिसत असून, बसस्थानकाचा परिसर जणू खासगी वाहनतळ बनल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दुचाकी, ऑटोरिक्षा आणि चारचाकी वाहनांच्या मनमानी पार्किंगमुळे एसटी बसला बसस्थानकात प्रवेश करणे, बाहेर पडणे आणि वळविणेही कठीण झाले आहे. विशेष म्हणजे, बसस्थानकाच्या दोन्ही बाजूंना सुमारे २०० मीटरपर्यंत वाहनांचा विळखा पडल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

पारध हे परिसरातील महत्त्वाचे गाव असल्याने येथील बसस्थानकावर दररोज महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासह आजूबाजूच्या रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात असल्याने एसटीच्या वाहतुकीचा अक्षरशः खोळंबा होत आहे. प्रवाशांना बसमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बस वळविताना चालकांची कसरत; वरून अरेरावीचा त्रास!

खासगी वाहनांच्या गर्दीतून एसटी बस बाहेर काढताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. काही वाहनधारकांकडून एसटी बस चालकांशी अरेरावीची भाषा केली जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. सार्वजनिक वाहतुकीची जबाबदारी पार पाडणाऱ्या चालकांनाच अशा परिस्थितीत मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?

या बेशिस्त पार्किंगचा सर्वाधिक त्रास महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षितपणे उभे राहण्यासाठी जागा मिळत नाही. गर्दीच्या वेळी वाहनांची ये-जा आणि प्रवाशांची धावपळ यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. एखादी दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

एसटी महामंडळ आणि पारध पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवावी!

बसस्थानकापासून दोन्ही बाजूंना सुमारे २०० मीटर परिसरात नो-पार्किंग क्षेत्र निश्चित करून बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी. एसटी महामंडळ आणि पारध पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून बसस्थानक परिसर अतिक्रमणमुक्त व वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बसस्थानक हे प्रवाशांच्या सोयीसाठी की खासगी वाहनांच्या पार्किंगसाठी? हा प्रश्न आता पारधकरांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष घालून ठोस कारवाई न केल्यास भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.

न्यूज जालना YouTube व्हिडिओ

News Jalna YouTube चॅनेलला भेट द्या

न्यूज जालना Facebook पेज

NEWS JALNA — एकूण बातमी पृष्ठ भेटी1,100,620
बातमीचे वर्तमानपत्र स्वरूप
NEWS JALNA
आपल्या परिसरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या

ही बातमी वाचल्याबद्दल धन्यवाद • newsjalna.com

मोठी बातमी असल्यास इमेज लांब होऊ शकते. संपूर्ण मजकूर या इमेजमध्ये समाविष्ट केला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!