आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर २८ नोव्हेंबरला जालन्यात! ‘जनसंवाद यात्रे’त आरोग्य संस्थांना देणार भेट; लाभार्थ्यांशी साधणार संवाद
NEWS JALNA
जालना | न्यूज जालना वृत्तसेवा
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर हे २८ नोव्हेंबर २०२६ रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, यावेळी त्यांच्या ‘जनसंवाद यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांना भेट देऊन लोकप्रतिनिधी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांशी संवाद साधणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
या दौऱ्यादरम्यान मंत्री महोदय विविध आरोग्य योजनांचा आढावा घेणार आहेत. यामध्ये पॅलिएटिव्ह रुग्ण, सिकलसेल रुग्ण, संस्थात्मक प्रसूती झालेल्या मातांच्या घरी भेट, आरबीएसके अंतर्गत शस्त्रक्रिया झालेल्या बालकांची भेट, टीबी व कुष्ठरोग रुग्ण, जननी सुरक्षा योजनेचे लाभार्थी, कर्करोग तपासणी मोहिमेतील लाभार्थी तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या (MJPJAY) लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे.
दरम्यान, सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियमितपणे मुख्यालयी उपस्थित राहून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा द्याव्यात तसेच आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता राखावी, अशा स्पष्ट सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी दिल्या आहेत.
या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाणार असून, आरोग्य योजनांची अंमलबजावणी आणि लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांकडे विशेष लक्ष राहणार आहे.

न्यूज जालना YouTube व्हिडिओ
न्यूज जालना Facebook पेज

मोठी बातमी असल्यास इमेज लांब होऊ शकते. संपूर्ण मजकूर या इमेजमध्ये समाविष्ट केला आहे.