घनसावंगीकरांसाठी मोठी खुशखबर! ३१ कोटींचे १०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय सुरू;
NEWS JALNA
घनसावंगी | किशोर मोरे
घनसावंगी आणि परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. तब्बल ३१ कोटी २५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या १०० खाटांच्या अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आधुनिक आरोग्य सुविधांसाठी मोठा आधार मिळणार आहे. मात्र, केवळ भव्य इमारत उभारून चालणार नाही, तर रुग्णालयात पुरेसे डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध करून दर्जेदार उपचार मिळाले पाहिजेत, असे स्पष्ट मत आरोग्यमंत्री आबिटकर यांनी यावेळी व्यक्त केले.
घनसावंगी येथील या रुग्णालयाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना कमी खर्चात तसेच आवश्यकतेनुसार मोफत आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले.
१,४०० डॉक्टर आणि १,९०० आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती
राज्यात आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी १ हजार ४०० वैद्यकीय अधिकारी आणि १ हजार ९०० समुदाय आरोग्य अधिकारी सेवेत दाखल करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आंदोलन करणाऱ्या १५ हजार कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. नव्याने नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक स्तरावर वास्तव्यास राहून नियमितपणे रुग्णसेवा द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
रुग्णालयाची इमारत मोठी, पण आरोग्य सेवा त्याहून दर्जेदार हवी!
रुग्णालयांच्या आधुनिक इमारती उभारण्याबरोबरच तेथील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार, लोकाभिमुख आणि रुग्णांना दिलासा देणाऱ्या असणे गरजेचे आहे. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सेवाभावाने काम करून सामान्य नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा द्याव्यात, असे आवाहन आरोग्यमंत्री आबिटकर यांनी केले.
३५० नवीन रुग्णवाहिका उपलब्ध होणार
राज्यातील १०८ रुग्णवाहिका सेवेसाठी उपलब्ध असलेल्या १ हजार ७५० वाहनांपैकी पहिल्या टप्प्यात ३५० रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांना अधिक प्रभावी उपचार मिळावेत, यासाठीही आवश्यक बदल करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
रिक्त पदांचा प्रश्न खासदार संजय जाधव यांनी मांडला
यावेळी खासदार संजय जाधव यांनी जिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका चालक, परिचारिका तसेच विविध संवर्गांतील रिक्त पदांचा प्रश्न उपस्थित केला. आरोग्य संस्थांमधील रिक्त पदे तातडीने भरल्यास रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
महाकाळ, तीर्थपुरी, साष्टे पिंपळगावच्या रुग्णालयांचाही प्रश्न ऐरणीवर
आमदार हिकमत उढाण यांनी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन कार्यक्रम साधेपणाने आयोजित केल्याचे सांगितले. ३१ कोटी २५ लाख रुपये खर्चून उभारलेल्या रुग्णालयाचा घनसावंगी व परिसरातील नागरिकांना मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घनसावंगी येथील ४६ बालकांच्या हृदयशस्त्रक्रिया ठाणे येथे करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. महाकाळ, तीर्थपुरी आणि साष्टे पिंपळगाव येथे रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध असून, तेथील रुग्णालयांच्या बांधकामासह आवश्यक मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांचे प्रश्नही मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली.
आठ बालकांचा विशेष सन्मान
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी घनसावंगी येथील आरोग्य संस्थेचा प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ३० खाटांच्या रुग्णालयापर्यंत आणि आता १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयापर्यंत झालेला प्रवास विशद केला. यावेळी हृदयशस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आठ बालकांचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.
दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना आरोग्य सेवांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी आरोग्य विभागाने संवेदनशीलतेने काम करावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू मिसाळ यांनी केले, तर मोहन गोडसे यांनी आभार मानले.
न्यूज जालना YouTube व्हिडिओ
न्यूज जालना Facebook पेज

मोठी बातमी असल्यास इमेज लांब होऊ शकते. संपूर्ण मजकूर या इमेजमध्ये समाविष्ट केला आहे.