४५ हजार लोकांना देणार रोज जेवण,सोनू सूदचा पुन्हा दिलदार

57

Get real time updates directly on you device, subscribe now.

dr murkute newsjalna d 27-09

, ४५ हजार लोकांना देणार रोज जेवण.

मनोरंजन-

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाविरोधातील या लढाईमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात पुढे करत जुहूमधील हॉटेल कोरोनाविरोधात लढणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी दिलं. त्यानंतर आता सोनू सूदने आणखी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोनू सूद त्याचे वडील शक्ती सागर सूद यांच्या नावावर एक योजना सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत तो मुंबईत दररोज ४५ हजार नागरिकांना जेवण देणार आहे. सोनू सूदने या योजनेचे नाव ‘शक्ती आनंदनम’ असे ठेवले आहे. सोनूने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘सर्वांनी कोरोनाविरोधातील लढाईसाठी एकत्र आले पाहिजे. कोरोनाच्या संकटामुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत तर कोणाकडे खाण्याची आणि जगण्याची सोय नाही. ही एक कठीण वेळ आहे. या लोकांच्या मदतीसाठी मी योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे लोकांना जेवण दिले जाणार आहे.’

सोनू सूदप्रमाणेच अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी कोरोनाविरोधातील लढाईसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षय कुमारने कोरोनाविरोधातील लढाईसाठी २८ कोटींची मदत केली. तर शाहरुख खानने त्याची कार्यालयीन इमारत ही क्वारंटाइन सोयीसाठी दिली. त्याचसोबत सलमान खान, आमिर खान, रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा, आलिया भट, अनुष्का शर्मा, सनी देओल, करिश्मा कपूर, करीना कपूर यांनी कोरोनाविरोधातील लढाईसाठी मदत दिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new