डिजिटल व्यवहारामुळे कोरोनाचा धोका होतोय कमी

70

Get real time updates directly on you device, subscribe now.

dr murkute newsjalna d 27-09

ऑनलाइन बँकिंग व्यवहारात होतेय वाढ

गुगल पे फोन पे भिम अॅपचा अधिक वापर

पिंपळगाव रेणुकाई

आजतागायत कोरोणाचा प्रसार रोखण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रकारच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत.दरम्यान नोटाबंदीच्या काळात शासनाकडून ऑनलाइन व्यवहार करण्यावर भर देत होते.मात्र आता कोरोणाणाच्या पाश्र्वभूमीवर चलणी नोटा हाताळण्याऐवजी नागरिक डिजिटल व्यवहारांवर अधिक भर देत आहे तालुक्यात इंटरनेट बँकिंग मोबाईल अॅपचा वापर वाढल्याचे समोर आले आहे.कोरोणाव्हायरसमुळे लॉकडाउन वाढवून दिला आहे.त्यामुळे तालुक्यातील सर्व बॅंकांना दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.अनेकजन बॅकेसमोर गर्दी न करता घरांत बसुन ऑनलाइन

व्यवहाराचा वापर करतांना दिसत आहे.ग्रामीण भागातील औषध दुकान. किराणा दुकान.पेट्रोल पंप यांनी सुध्दा अॉनलाईन स्वाइप मशीन किंवा गुगल पे. फोन पे. पेटिएम.भिम अॅप यासह मोबाईल बॅकिंगच्या माध्यमातून व्यवहार होत आहे.ग्रामीण भागातील ज्या नागरिकांना ऑनलाईन व्यवहार कसे करावेत.याचे ज्ञान नसल्यामुळे त्यांना मात्र सामाजीक अंतराचे नियम न पाळता गर्दीत घुसून व्यवहार करावे लागत आहे.यासाठी त्यांची मात्र तारांबळ उडत आहे.कोरोणा विषाणूच्या पाश्र्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर उद्योग व्यवसाय पुर्णतः ठप्प आहेत‌.याचा अर्थीक उलाढाली वर फार मोठा परिणाम झाल्याचे चित्र सद्या संपूर्ण देशासह महाराष्ट्रात आणि त्याची झळ ग्रामीण भागाततर जास्त प्रमाणात पोहचली आहे.सद्याजे व्यवहार सुरु आहेत.त्यामधील सुमारे 30 ते 40 टक्के व्यवहार हे इंटरनेट बँकिंग मोबाईल अॅपच्या माध्यमातून चालू आहेत. बॅंकानिही कर्मचारी संख्या अपुरी असल्याने ग्राहकांनी डिजिटल व्यवहार करावेत इंटरनेट बँकिंग चा अधिक वापर करावा यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.नोटाबंदिच्या काळात ऑनलाइन व्यवहार करण्याबाबत ग्राहकांना विनंती करावी लागत होती.आता कोरोणा व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर काही जागरुक नागरिकांनी स्वताहुन डिजीटल बॅंकिंगचा वापर वाढविले असल्याचे पहावयास मिळत आहे.त्यातच बॅंकांनाही कमी कर्मचार्यावर आपले काम चालविले शक्य होत आहे.यामुळे त्यांचाही काम करण्याचा उत्साह वाढल्याचे दिसत आहे.

तालुक्यात बरेच ठिकाणी मोबाईल इंटरनेट बॅंकिंग वापरण्यास चांगला प्रतिसाद

मोबाईल रिचार्ज.टि व्ही रिचार्ज.लाईट बील.गॅस सिलेंडर बुकिंग.तसेच विमा हप्ता.जमा करण्याकरिता मोबाईल अॅपचा सर्वाधिक वापर होत आहे.त्याच बरोबर किराणा सामान .औषधी दुकान.या ठिकाणीही विक्रेत्याकडुन.वापर वाढला आहे आणि ग्राहक सुद्धा अशा पध्दतीने व्यवहार करण्यास अतिशय चांगल्याप्रकारे प्रतिसाद देत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new