शेतकऱ्यांच्या मुलांनी दुग्ध व्यवसायात उतरावे – संदीप काळे

Get real time updates directly on you device, subscribe now.


पारधन्यूज प्रतिनिधी – दुग्धव्यवसायात लागणारा सर्व कच्चामाल शेतकऱ्यांकडून घेतला जातो त्यामुळे या क्षेत्रांत शेतकऱ्यांना फार महत्त्व आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी या व्यवसायात उतरल्यास त्यांची आर्थिक व सामाजिक प्रगती होईल असे प्रतिपादन अमूल डेअरी,भोईसर चे उत्पादन व्यवस्थापक मा.श्री.संदीप काळे यांनी ऑनलाइन शिकवणी द्वारे विद्यार्थ्यांना केले.12 वी नंतर दुग्ध क्षेत्रात विद्यार्थांना असलेलेल्या विविध संधी या विषयावर ते मार्गदर्शन त्यांनी केले. राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालया तर्फे कोरोना व लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्राचार्य राजाराम डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा.अमोल बांडगे यांच्या पुढाकाराने ऑनलाईन शिकवणी घेतली जात आहे विषय ज्ञाना बरोबरच विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधीचे देखील मार्गदर्शन विविध क्षेत्रातील मान्यवर व प्राध्यापक विद्यार्थ्यांना करत आहे. या ऑनलाईन शिकवणी च्या यशस्वीतेसाठी प्रा.मंगेश लोखंडे, प्रा.वरून आंबेकर, प्रा.अर्जून राजबिंडे, प्रा.लक्ष्मण खरात, प्रा.धनराज भोसले, प्रा.राजू धनवई, प्रा.दिनेश कापरे, डी.डी.सोनुने आदी प्राध्यापक मेहनत घेत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new