Breaking News
भोकरदन तालुका

सोयाबीनवरील चक्रीभुंगा आळीचे नियंत्रणासाठी-कृषि विभागाचा शेतकऱ्यांच्या आव्हानास प्रतिसाद

पिंपळगाव रेणुकाई प्रतिनिधी

कापूस व मका पिकाबरोबरच सोयाबीन हे परिसरातील महत्त्वाचे पीक आहे. यंदा सोयाबीन पिकाच्या बियाणे संकटानंतर सद्यस्थितीत असणारे ढगाळ वातावरण आणि हवेतील आद्रता यामुळे सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा आळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे.

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई, वालसावंगी, धावडा, जळगाव सपकाळ या परिसरात एकूण ६१०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा पेरा झाला आहे. सध्या फुले लागण्याचा अवस्थेत असलेल्या सोयाबीन पिकाच्या खुरपणी, कोळपणी, फवारणी या कामांनी गती घेतली आहे, त्यातच सोयाबीन वरील चक्री भुंग्याचा ( गर्डल बिटल ) प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे.

शेतात जर सोयाबीन पिकाची पाने व शेंडा सुकलेला दिसून आल्यास चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव आहे असे समजावे. याची मादी पानाचे देठ व खोडावर अंडी घालते. एका जागी घातलेल्या अंड्यांची संख्या ७८ असते.

ज्ञानेश्वर दुरगुडे- मंडळ कृषि अधिकारी धावडा

सध्याचे ढगाळ वातावरण व हवेतील आद्रता यामुळे सोयाबीन पिकावर चक्री भुंगा आळीचा प्रादुर्भाव संभवतो सोयाबीन पिकाची पाने व शेंडा सुकणे हे चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसल्यास पाच टक्के निंबोंळी अर्क, प्रोफेनोफोस ५० ईसी, ट्राॅयझोफाॅस ४० ईसी, इथिआॅन ५० ईसी या किटकनाशकांची फवारणी घ्यावी.

अंड्यातून बाहेर पडणाऱ्या आळ्या पानांचे देठ व खोड पोखरतात त्यामुळे याठिकाणच्या सोयाबीन पिकाची पाने व शेंडे सुकायला सुरुवात होते. अशा प्रकारची लक्षणे दिसून आल्यास शेतकऱ्यांनी घाबरून न जाता ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा एझाडिरॅक्टिन १५०० पीपीएम निम आॅईल ( २५ मिली) प्रति १० लिटर पाण्याबरोबर फवारणी करावी जेणेकरून मादी आळीच्या अंडी घालण्याच्या क्रियेला अटकाव करता येतो. तसेच जास्त प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी ( १५ मिली ) किंवा ट्रायझोफॉस ४० ईसी ( २५ मिली ) या किटकनाशकांची फवारणी घेणे, वरील किटकनाशकांचे प्रमाण साध्या पंपाचे असून पेट्रोल पंपासाठी तिप्पट मात्रा वापरावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक