मंठा तालुका

मंठा तालुक्यातील तळणीत शांतता बैठक : ग्रामस्थांनी मांडल्या अडीअडचणी

  न्यूज तळणी (ता मंठा) : येणाऱ्या काळातील सण परंमपरेनुसार घरातचं साजरे करा . सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता कायदा -सुवेवस्था बिघणार नाही, यासाठी ग्रामस्थानी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंठा पो . नि . विलास निकम यांनी केले . ते तळणी ग्रामपंचायत कार्यालयात शांतता कमिटीच्या बैठकीत बोलत होते . याप्रसंगी सरपंच उध्दवराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. येणाऱ्या काळातील बकरी ईद ,गणपती , पोळा हे सण हिंदु – मुस्लिम बांधवांनी परंमपरेनुसार घरात साजरे करावे , सण साजरा करताना कोठेही गर्दी न करू, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शोसल डिस्टन्सिंग ठेवणे , सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावे, कामानिमित्य बाहेर पडावे, प्रत्येकांनी सजक राहून आपली व आपल्या कुटूबाची काळजी करावी, प्रत्येकाने स्वतःला पोलीस समजून जबाबदारी पार पाडावी ,असे आव्हान निकम यांनी उपस्थित ग्रामस्थांना केले . याप्रसंगी ग्रामस्थांनी आपल्या अडीअडचणी पोलीस निरक्षकांकडे माडल्या. ग्रामस्थांच्या सर्व आडीअडचणी शांततेत ऐकुन त्यांचे समाधान केले . या बैठकीला तळणी बीट जमादार केशव चव्हाण, हेड कॉन्स्टेबल खलसे, उपसरपंच सुधाकर सरकटे , रामेश्वर सरकटे, भगवान मुदळकर, अशोक राठोड, बबनराव सरकटे, मकसुद बागवान, रितेश चंदेल, गौतम सदावर्ते, महादेव माने, करीम पठाण, शौकत कुरेशी, प्रविण सरकटे , दत्ता खरात, अमोल सरकटे, विजय गायकवाड, जयदेव मुर्तडकर, गजानन सरकटे, रमेशराव सरकटे, बाळु गायकवाड, मधुकर सरकटे ,महादेव सरकटे, मोहीन बागवान ,नामदेव चौघुले यांच्यासह अनेकांची उपस्थित होती . रस्त्यावरील फ्रुट व भाजीपाला हटवा – सरकटे बस स्टॅन्ड चौकात रस्त्यावर फळविक्रेते व भाजीपाला विक्रेते बसत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत असून वार वार वाहतूक कोंडी होत असल्याने रस्त्यावरील फ्रुट व भाजीपाला दुकाने इतर तर हटवावे अशी मागणी उपसरपंच सुधाकर सरकटे यांनी केली . दारूची विक्री बंद करा – राठोड ग्रामपंचायत सदस्य अशोक राठोड यांनी बस स्टॅन्ड भागातील अवैध दारू व पेट्रोल विक्री बंद करण्याची केली . महावितरणच्या अभियताविरूद्ध तक्रारी … महावितरणचे कनिष्ठ अभियंता जंगम यांनी मागील आठवडयात विजेचे बील भरलेल्या ग्राहकाविरूद्ध कनेशन कट करण्याची कारवाई केली होती . या सदर्भात पो. नि . निकम यांच्याकडे ग्रामस्थानी तक्रारी केला . यावेळी निकम यांनी जंगम यांना आकडेबहाद्दराविरूद्ध कारवाई करा . पण, नियमीत वीज बील भरणाऱ्याना सेवा दया- असे सागितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक