परतूर तालुका

कोरोणा उपचारासाठी केंद्राची राज्याला भरीव मदत-लोणीकर

दीपक हिवाळे/ परतूर न्यूज नेटवर्क

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्र राज्याला कोरोणा उपचारासाठी भरीव मदत केली असल्याचे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात माजी मंत्री तथा आ. बबनराव लोणीकर यांनी म्हटंले आहे.


पुढे या पत्रकात आ. लोणीकर यांनी म्हटंले की,केंद्र सरकाराने देशातील सर्व राज्यांना 2 कोटी 18 लाख N-95 मास्क दिले पैकी 21 लाख 84 हजार N-95 मास्क मिळाले आसून कोरोणा उपचार करणा-या डॉक्टर व पेशंट संपर्कात राहणा-या यंत्रणेसाठी पि. पि. सुरक्षा किट देशभरात 1कोटी 21 लाख किट वितरीत करण्यात आल्या त्या पैकी 11 लाख 78 हजार पि. पी. ई. किट महाराष्ट्राला मिळाल्या आसल्याचे पत्रकात म्हटले आसून, एचसीक्यु गोळ्या औषधीचे देशात एकूण 6 कोटी 12 लाख वाटप करण्यात आल्या त्यापैकी, महाराष्ट्राला 77 लाख 20 हजार एचसीक्यु गोळ्या औषधे मिळाले आसल्याचे नमूद केले आहे

देशभरात 9 हजार 150 व्हेंटिलेटर विविध राज्यांना देण्यात आले पैकी महाराष्ट्राला 1 हजार 805 व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्यात आले आसल्याचे पत्रकात म्हंटले आसून राज्यातील आघाडीचे कोरोणा नियंत्रणात आणण्यात कमी पडत आसून ढिसाळ नियोजन शुन्य असल्यामुळे राज्यातला रूग्णांचा आकडा वाढत आसून हि चिंतेची बाब आहे. उगाच केंद्राकडे बोट न दाखवता आत्मपरीक्षण करण्याचे सांगतांनाच जनसामांन्याच्या जिवासी तु- तु मै- मै करीत खेळू नये असे पत्रकात नमूद केले आहे.
केंद्राने राज्याला केलेल्या मदतीची आकडेवारी आनील गलगले यांनी मागवलेल्या माहीतीच्या अधिकारात समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक