घनसावंगी तालुका

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अर्भकाचा खून करून नदीत फेकणाऱ्या मातेला केले जेरबंद

 

घनसावंगी /प्रतिनिधी – अनैतिक संबंधातून जन्मलेल्या एक दिवसाच्या बालकाला नदीच्या पात्रात फेकून जीवे मारणाऱ्या मातेचा अवघ्या १२ तासात शोध लावण्यात घनसावंगी पोलिसांना यश आले आहे. या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य एका आरोपीच्या शोधात पोलीस आहेत.

याबाबत माहिती अशी कि, घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बु.!! येथील नारोळा नदीच्या पात्रातील डोहात काल ता. २४ जुलै २०२० रोजी कपड्यात गुंडाळले एक नवजात अर्भक तरंगतांना ग्रामस्थांना आढळले होते. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजीराव बंटेवाड यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला होता.

या नवजाताचा अर्भकाचा साडीने गळा आवळून जिवंत ठार मारून त्याला नदीत फेकल्याचे दिसून आले होते. प्रारंभी घनसावंगी पोलीस ठाण्यात स्थानिक पोलीस पाटील भगवंत आर्डे यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या अर्भकाचे कुंभार पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्येही त्याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यामुळे काळ सांयकाळी पोलीस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी रात्रीतून जोरदार तपास चक्रे फिरवून याप्रकरणाचा १२ तासाच्या आतमध्ये पर्दाफाश केला आहे. गावातीलच एका महिलेला अनैतिक संबंधातून हे अर्भक जन्मले होते. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या अनैतिक संबंधाची वाच्यता होऊ नये म्हणून तिने जन्मलेल्या या अर्भकाचा गळा साडीने आवळून त्याला नदीच्या पाण्यात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी बाब तपास पुढे आल्याने त्या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सी. डी. शेवगन यांच्या मार्गदर्शनाखाली घनसावंगीचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने, मनोहर खिळदकर, सचिन कापुरे, पोलीस कर्मचारी राऊत, देवडे, विठ्ठल वैराळ, जाधव, वैद्य, केंद्रे, महिला कर्मचारी मीरा मुसळे यांनी ही कामगिरी पार पडली आहे.

माता न तू वैरिणी! नारोळा नदीत नवजात अर्भक फेकून माता पसार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक