भोकरदन तालुका

उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयाला 20 टक्के अनुदान वितरणाचा निर्णय घ्या,नसता ३१ जुलै रोजी अंदोलन करु

मधुकर सहाने : भोकरदन

राज्यातील अनुदानास पात्र घोषित विनाअनुदानित उच्च माध्यमिकचा अधिवेशनातील मंजूर निधी वितरीत करण्यासंबंधात येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेतर्फे करण्यात आली आहे.


राज्यात फेब्रुवारी २०१८ ला १४६ व सप्टेंबर २०१९ ला १६३८ विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदानास अपात्र घोषित करण्यात आले १ एप्रिल २०१९ पासून २० टक्के अनुदान मंजूर करत शासन निर्णय जारी करण्यात आला. परंतु दीड वर्ष उलटूनही शिक्षकांना याचा लाभ मिळालेला नाही.

त्यामुळे सध्या विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षक तणावपूर्ण जीवन जगत आहे एप्रिल २०१९ पासून २०% वेतनासाठी १०६ कोटी ७४ लाख ७२ हजार इतकी रक्कम पुरवणी मागणीतने मंजूर करण्यात आली हा निधी वितरित करण्यासाठी अद्याप शासन निर्णय निर्गमित न झाल्याने गेले चार महिने कृती संघटना व व विविध विभागाचे शिक्षक आमदार पाठपुरावा करीत आहेत औरंगाबाद विभाग शिक्षक आमदार माननीय माननीय विक्रम काळे साहेब यांनी माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासोबत चर्चा करून ३१ जुलैपर्यंत आपल्या पगाराचा प्रश्न मिटेल तसेच उच्च माध्यमिक बिंदुनामावली तयार करण्याचे शासनाचे पत्र रद्द करण्यात येईल असे आश्वासन दिले .

राज्य सरकार यासाठी सकारात्मक असली तरी शिक्षण व अर्थ खात्याचे अधिकारी आडकाठी आणून दिरंगाई करीत आहेत राज्यात उच्च माध्यमिक शिक्षक बिन पगारी नोकरी करून उदरनिर्वाह चालण्यासाठी मजुरी, हॉटेल काम,रिक्षा,दुग्ध व्यवसाय हि कामे करत आहे टाळेबंदी मुळे हाताला काम नाही कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा अशा संकटात शिक्षक सापडले आहे त्यामुळे ३१ जुलैपर्यंत २० टक्के वितरणाचा शासन निर्णय निघाला नाही तर ३१ जुलै नंतर सर्व विनाअनुदानित शिक्षक रस्त्यावर उतरणार आहे. अशी मागणी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शाळा कृती समिती भोकरदन तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रविण विठ्ठल लहाने उपाध्यक्ष झिने सर, सचिव प्राध्यापक गव्हाने ,आर.  एस.सहसचिव प्राध्यापक फुके सर, कोषाध्यक्ष प्राध्यापक तांगडे सर, प्रसिद्धीप्रमुख प्राध्यापक शेळके डी. आर.संघटनेने केली आहे.

   शासनाने उच्च माध्यमिक शिक्षकांना पगार देण्याचे जाहीर करून देखील पगार सुरू केलेला नसल्याने आंदोलन करावे लागत आहे .लॉकडाऊनमुळे विनाअनुदानित शिक्षकावर उपासमारीची वेळ आली आहे. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना पगार वितरणाचा आदेश लवकर काढून असे आश्वासन दिले होते. परंतु याची पूर्तता झालेली नाही.
प्रा.प्रविन विठ्ठलराव लहाने
तालुकाध्यक्ष भोकरदन महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शाळा कृती संघटना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक