Breaking News
भोकरदन तालुका

गुरुकुल इंग्लिश स्कुल येथे वृक्षारोपण

मधुकर सहाने : भोकरदन


भोकरदन तालुक्यातील क्षिरसागर येथील नवीनच सुरू करण्यात आलेल्या गुरुकुल इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे खंडोबा मेडिकल व भोकरदन एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी सभापती एल.के.दळवी यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात जवळपास 100 विविध झाडांची रोपटे लावून वृक्षारोपण करण्यात आले.

शालेय विध्यार्थ्यांना निसर्ग रम्य वातावरणात शालेय शिक्षण घेता यावे हा मानस डोळ्यासमोर ठेऊन दळवी यांनी गुरुकुल इंग्लिश, मराठी व ज्युनिअर कॉलेज ची सुरुवात या परिसरात केली व विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आनंद वाघ,मा.सरपंच योगेश दळवी,मुख्याध्यापक ए. टी. कळम,दिनेश दळवी,देविदास बोर्डे, गणेश सुरासे,राहुल बनकर,सागर,विकास, राजू बलांडे आदींच्या हस्ते सुद्धा याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक