जालना जिल्हा

ग्रामीण भागात दररोज एक हजार अँटीजेन चाचणीचे नियोजन करा- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे

संपादक / दिगंबर गुजर न्यूज जालना- कोरोना संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले, डॉ. संजय जगताप, डॉ. हयातनगरकर, डॉ. शेजुळ आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना जालना जिल्ह्यामध्ये अँटीजेन तपासण्या करण्यासाठी 10 हजार किटसची मागणी करण्यात आली असुन ती दोन दिवसात उपलब्ध होईल. त्यानुसार ग्रामीण भागामध्ये दिवसाला किमान एक हजार अँटीनेज चाचण्या होतील, यादृष्टीकोनातुन सुक्ष्म असे नियोजन करण्यात यावे. त्याचबरोबर कोव्हीड हॉस्पीटल, कोव्हीड केअर सेंटर यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधींसह इतर साहित्याचे आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधी अथवा आवश्यक साहित्य उपलब्ध नाही, अशी कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही, याची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले. जालना येथे आरटीपीसीआर लॅबची उभारणी करण्यात आली असुन या ठिकाणी चाचण्याही करण्यात येत आहेत. परंतु या लॅबच्या माध्यमातुन दिवसाला किमान एक हजार चाचण्या होतील, अशा पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देशीत आहे कोव्हीड रुग्णालय तसेच लॅबसाठी मनुष्यबळाची कमतरता असेल तर तातडीने भरती करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. कोव्हीड बाधितांच्या संपर्कामध्ये आलेल्या सहवासितांचा अत्यंक अचुकपणे शोध घेण्यात यावा. हायरिस्क असणाऱ्या सहवासितांना तातडीने कोव्हीड सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातील ज्या खाजगी दवाखान्यांचा समावेश करण्यात येऊन 80 टक्के खाटा राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्याठिकाणी सर्वसामान्यांना खाटांचे नियमाप्रमाणे वाटप करण्यात येते किंवा नाही याची नायब तहसिलदारांमार्फत तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक