Breaking News
परतूर तालुका

व्यापारी संकुला वर पावसाची टांगती तलवार कायम !


पोकलँड आली अन खड्डा खांदुन गेली ..

आष्टी प्रतिनिधी :- आष्टी ता परतूर येथे आष्टी ग्रामपंचायत च्या वतीने उभारण्यात आलेले व्यापारी संकुलात दिनांक 24 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान आलेल्या अल्पशा पावसाने संकुलाचा तळमजला पाण्यात गेला होता या मुळे येथील व्यापाऱ्यात चिंता वाढली होती त्या दिवशी उशीरा रात्री पर्यंत अनेक व्यापारी आपापल्या दुकानात पाणी ओसरे पर्यंत जागरण करत खालचा माल टेबलावर ठेवून दुकानात पाणी शिरू नये यासाठी काळजी घेण्यासाठी धडपड करत होते

व्यापाऱ्यांनी आष्टी ग्रामपंचायत ला पाण्याबाबत उपाययोजना तात्काळ करून देण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने मेघा कँपनीचे कर्मचारी गोल सिमेंट चे पाईप व पोकलँड घेऊन आले खरे मात्र काल रात्रीच्या सुमारास संकुलाच्या लगत संरक्षक भिंती जवळ रस्त्या लगत या संकुलाचे पाणी काढण्यासाठी खड्डा खांदला खरा मात्र त्यात ना सिमेंटचे पाईप टाकण्यात आले न पाणी

काढण्या बाबत चे काम पूर्ण करण्यात आले त्याचे काम अर्धवट अवस्थेत ठेवून पोकलँड निघून गेली असून हे काम तात्काळ करणे गरजेचे असून या कामात गती यायला हवी सध्या तरी हे काम पूर्ण होण्या अगोदर एखादा दमदार पाऊस झाल्यास परत व्यापारी संकुलाच्या तळमजल्या तील व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान या अर्धवट कामाविषयी ग्रामविकास अधिकारी नामदेव काळे यांच्याशी संपर्क केला असता माहिती घेऊन सांगतो असे म्हणाले दरम्यान पावसाची टांगती तलवार संकुलाच्या तळमजल्या वरील व्यापाऱ्यांवर आहे हे मात्र खरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक