मंठा तालुका

मंठ्यात रविवारपासुन कापूस खरेदीचा समारोप- एकूण 4909 शेतकऱ्यांचा केला खरेदी कापूस

मंठा न्यूज /रमेश देशपांडे कृषी उत्पन्न बाजार समिती मंठा च्या वतीने ऑनलाईन व ऑफलाईन आधारे 4909 कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस भारतीय कपास निगम (सीसीआय) अंतर्गत 1 लाख 47 हजार 495 खरेदी करण्यात आली.या कापूस खरेदीचा समारोप रविवारी करण्यात आला.


कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मध्यंतरी काही दिवस कापूस खरेदी बंद ठेवण्यात आली होती. मात्र माजी मंत्री आ.बबणराव लोणीकर यांनी जिल्हा उपनिबंधक, बाजार समिती मंठा व जिनींग मालकाला सुचणा केल्यानंतर सोशल डिस्टंसिंग चा नियम पाळुण कापूस खरेदी सुरू करण्यात आली. यावेळी जवळपास पाच हजार शेतकर्‍यांनी कापुस खरेदीसाठी नोंद केली होती.


28 एप्रिल ते 26 जुलै या कालावधीत 1 हजार 798 शेतकऱ्यांचा 41 हजार 195 क्विंटल कापूस सीसीआय अंतर्गत खरेदी करण्यात आला. तर चालू हंगामात खासगी जिनिंग वर 2 लाख 5 हजार 542 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. असा एकूण मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीत 3 लाख 53 हजार 37 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.
26 जुलै रविवार रोजी सीसीआय कापुस खरेदी केंद्राचा समारोप बाजार समितीचे सभापती संदीप गोरे, उपसभापती राजेश मोरे, संचालक सतीशराव निर्वळ, निवास देशमुख, विठ्ठलराव काळे, मुस्तफा पठाण यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या प्रसंगी महावीर जिनिंगचे मालक संजय छल्लाणी, सीसीआय केंद्रप्रमुख पंकज ठाकरे, शेतकरी मोहन आडे, हमाल प्रतिनिधी नारायण राठोड यांचा बाजार समितीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.


यावेळी बाजार समितीचे सचिव शिवसिंग छानवाल, लेखापाल रमेश बोराडे, निरीक्षक शामराव हजारे, बाळासाहेब कुलकर्णी, विनोद चव्हाण शेख वाजिद, संजय खरात, ज्ञानेश्वर नवरे, पुरुषोत्तम मोरे, योगेश हावळे,गोविंद गोरे यांच्यासह अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक