भोकरदन तालुका

सोयगाव देवी गावात सक्रोबा उत्साहात साजरा

मधुकर सहाने : भोकरदन

भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी गावात दर वर्षी प्रमाणे याही वर्षी सक्रोबा मोठ्या उत्साहात महिलांनच्या उपस्थिती साजरा करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षापासुन पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या सक्रोबा हा पंचमीच्या दुसर्या दिवशी असतो. ज्या महीलांनी नवस केलेला असतो त्या महिला दुर दुरहुन येतात तसेच नविन लग्न झालेल्या लेकी बाळी या ठिकाणी सक्रोबाच्या दर्शनासाठी येतात.

देवघरासारखा मातीचा सक्रोबा तयार करुन त्याला सजावट केली जाते व त्यामध्ये दिवा लावुन मारोतीची मंदीरासमोर या सर्व महिला जमा होऊन या ठिकाणी महिला गाणे,ओवी म्हणतात.
हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता असतो गावातील सर्वच महीला या ठिकाणी उपस्थित असतात नंतर सर्वांचे दर्शन झाल्यावर ७:३० ला या सक्रोबाचे विसरजनासाठी सर्व महिला जातात आणि आरती करुन या सक्रोबाचे विसरजण करतात,या महिलांच्या मते यांचा नवस पुर्ण झाला म्हणुन यांनी सक्रोबा केल्याचे उपस्थित महिलांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक