भोकरदन तालुका

मोकाट कुञ्यांची बरंजळा साबळे गावात दहशत,गावकर्यात भितीचे वातावरण

मधुकर सहाने : भोकरदन

भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे गावात मोकाट कोञ्यांनी आतंक घातला असुन गावात व परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुञे फिरत असल्याने ग्रामस्थात भितीचे वातावरण पसरले आहे.

अधिक माहीती की,भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे गावात गेल्या काही दिवसापासुन मोकाट कुञे गावात व परिसरात फिरत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण असुन,या कुञ्यांनी आज दादाराव सुखदेव राऊत यांच्या एका बकरीचा फडसा पाडला आहे.त्यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.दादाराव राऊत यांना पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल साबळे सह गावकर्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक